सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

Loan Moratorium Case : आता या तारखेला होणार निर्णय

करोना काळात कर्जाचे हप्ते भरण्यास स्थगिती देणारे लोन मोराटोरियम प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.

लोन मोराटोरियम प्रकरणात (Loan Moratorium) सर्व पक्षांना १२ ऑक्टोंबरपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी १३ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने लोन मोराटोरियमवर सुनावणी घेतली. त्यात असे म्हटले आहे की, याचिकाकर्तांनी ज्या मुद्दावर स्पष्टीकरण मागितले आहे, त्यावर केंद्र सरकार आणि आरबीआयने शपथपत्रात माहिती द्यावी. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत बँकांनी कोणत्याही कर्जदारास नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) घोषित करू नये.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com