‘सुप्रिम’ विचारणा : कृषी कायदेच नाही तर आंदोलन कोणाविरोधात


‘सुप्रिम’ विचारणा : कृषी कायदेच नाही तर आंदोलन कोणाविरोधात
सर्वोच्च न्यायालय

कृषी कायदे (New Farm Laws) रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेबाहेर (Delhi) शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. दिल्लीत आंदोलन करु देण्याच्या मागणीसाठी किसान महापंचयीतने (Kisan Mahapanchayat) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालय
Cruise Drug Bust क्रूजवर पुन्हा छापा, आणखी ड्रग्ज जप्त, सहा जण ताब्यात

‘सध्या कृषी कायदाच लागू नाही तर किसान पंचायत कोणाच्या विरोधात आंदोलन करणार? कायद्याला स्थगिती आहे. मग विरोध का?’ असा सवाल न्यायालयाने (Supreme Court) किसान महापंचायला विचारला आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले की, एकदा तुम्ही कायद्यांना न्यायालयात आव्हान दिले असताना आंदोलनाचं काय कारण? तुम्ही कायद्याला न्यायालयात आव्हान देऊन तुमच्या अधिकाराचा वापर केला आहे, मग आंदोलनाला परवानगी का द्यायची?

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकरी संघटनांपेक्षा किसान महापंचायत वेगळी आहे. 26 जानेवारीच्या घटनेनंतर त्याने त्या संस्थांपासून स्वतःला दूर केलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com