Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याप्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' आदेश

प्रभाग रचनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली | New Delhi

प्रभाग रचना आणि थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर (Petition) आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी झाली…

- Advertisement -

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग रचना आणि थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीप्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) जा, असे आदेश याचिकाकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे आता उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या (bmc) प्रभाग रचनेत हस्तक्षेप करण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

प्रभाग रचनेबाबत राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीने प्रभाग रचना (Ward Reservation) केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. तसेच काही प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केल्याचेही याचिकेत म्हटले होते. त्यामुळे या प्रभाग रचना पूर्वीसारख्याच असाव्यात अशी मागणी करण्यात आली होती. आज त्यावर सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च न्यायालयातून सोडवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या