शिवसेनेला धक्का! सुप्रीम कोर्टाने 'ती' याचिका फेटाळली

शिवसेनेला धक्का! सुप्रीम कोर्टाने 'ती' याचिका फेटाळली

नवी दिल्ली | New Delhi

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेचे ४० आमदार (MLA) एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर महाविकासआघाडी (Mahavikas Aaghadi) कोसळून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) असणारे पक्षाचे‘धनुष्यबाण’हे चिन्ह राहणार की नाही हेही संकट निर्माण झाले आहे...

त्यातच आता शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई निर्णायक टप्प्यावर आली असून २२ ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पंरतु निवडणूक आयोगाने १९ तारखेपर्यंत मुदत दिल्यामुळे शिवसेनेने सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही मागणी फेटाळली असून वेळेवरच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.

शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांच्या अपात्रतेसंबंधी (Disqualification)इतर काही याचिका (Petition) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहेत. या याचिकांवरील सुनावणी (Hearing) २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे.

उद्धव ठाकरे तसेच शिंदेसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचे पुरावेही दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) आणि पक्षचिन्हावर कुणाचा हक्क आहे, यासंदर्भातील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत येत्या १९ ऑगस्ट रोजी घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाला झुगारून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटासंबंधीच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

दरम्यान, आज यासंदर्भातील एक याचिका उद्धव ठाकरे गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी तातडीने घ्यावी, अशी मागणी न्यायालयासमोर या गटाने केली. मात्र हे प्रकरण घटनात्मक पीठाकडे (Constitutional Court) द्यायचे की नाही या निर्णयासाठी लांबणीवर आहे, असा निर्वाळा सरन्यायाधीशांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com