Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारला झटका! परमबीर सिंग प्रकरणाचा तपास CBI करणार

राज्य सरकारला झटका! परमबीर सिंग प्रकरणाचा तपास CBI करणार

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (supreme court parambir singh case) महाराष्ट्र सरकारला झटका दिला आहे.

- Advertisement -

परमबीर सिंग (Parambir Sinha) प्रकरणाचा तपास आता सीबीआय (CBI) करणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी निष्पक्ष व्हावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

कारण या प्रकरणात जे आरोप आहेत ते राज्यातील यंत्रणेवर आहेत, राज्याच्या गृहमंत्र्यांवर आहेत. या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्याचं गरजेचं असल्याने हा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. परमवीर सिंग यांच्यावरील दाखल ५ खंडणी प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार आहे.

तसेच परमबीर सिंग यांचे निलंबन मागे घेत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. परमविर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे दिलासाच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस कौल यांनी हा निर्णय सुनावलं आहे.

मुंबईत वेगवेगळ्या तक्रारदारांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. सध्या ह्या पाचही प्रकरणात मुंबई पोलिस तपास करत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या