जितेंद्र आव्हाड यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'या' प्रकरणामुळे वाढणार डोकेदुखी

जितेंद्र आव्हाड यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'या' प्रकरणामुळे वाढणार डोकेदुखी

ठाणे | Thane

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे (NCP) नेते आ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत,.कधी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे, कधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे, तर कधी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आ. जितेंद्र आव्हाड यांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

मागील काही प्रकरणांतील अडचणी थांबत नाहीत तेवढ्यात आता आणखी एका प्रकरणामुळे आव्हाडांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा (Anant Karmuse beating cases) तपास पुन्हा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले असल्याने आव्हाड यांच्यासमोर अडचण उभी राहणार आहे. मारहाण प्रकरणात पुन्हा तपास करावा अशी मागणी करमुसे यांनी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात ही मागणी मान्य करण्यात आली आहे. 

जितेंद्र आव्हाड यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 'या' प्रकरणामुळे वाढणार डोकेदुखी
आता WhatsApp वर पाठवलेला मेसेज करता येणार एडिट, जाणून घ्या कसे?

अनंत करमुसे प्रकरणात राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक (security guard) आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या मारहाण प्रकरणी दिलेल्या निकालात आज सर्वोच्च न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना फटकारले आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आजच्या निकालात या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी मान्य केली आहे. तिन महिन्यात तपास संपवावा आणि चार्जशीट दाखल करावे असे निर्देष सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे सांगण्यात येते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com