दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा : सुप्रीम कोर्टाचे आदेश

दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा : सुप्रीम कोर्टाचे आदेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

पुढील दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा असे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे....

ओबीसी आरक्षणावर आज अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयात दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र राज्य सरकार आता काय भूमिका घेते यावर लक्ष लागून आहे.

दुसरीकडे पावसाळ्यात आजवर निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे आता सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. तर तिकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करत केवळ दोन वर्षे या सरकारने टाईमपास केला असल्याचे म्हणत निशाणा साधला.

Related Stories

No stories found.