सर्वोच्च न्यायालयाचे निकाल बघता येणार भारतातील प्रत्येक भाषेत

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल बघता येणार भारतातील प्रत्येक भाषेत

सर्वोच्च न्यायालयाचे (supreme court) निकाल देशातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीला वाचता यावेत या हेतूने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (Chief Justice of the Supreme Court) धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. एका बार कौन्सिल च्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्य न्यायालयाच्या निकालांच्या प्रती (judgement) देशातील प्रत्येक भाषेत उपलब्ध करून देण्याचे माझे मिशन आहे.

त्यासाठी कृत्रिम बुद्धिमतेचा (IA) वापर करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या प्रती भारतातील सर्व भाषेत अनुवादीत करण्याकडे पाऊल टाकणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून न्यायालयाचे कामकाज नागरिकांपर्यंत (citizens) पोहचविण्याची गरज आहे, जोपर्यंत आपण नागरिकांपर्यंत त्यांना समजेल अशा भाषेत पोहोचत नाही तोपर्यंत आपण करत असलेले काम नव्ह्यान्नव टक्के लोकांपर्यंत पोहोचणार नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com