हिजाब प्रकरण : दोन न्यायमूर्तींमध्ये मतभेद

हिजाब प्रकरण : दोन न्यायमूर्तींमध्ये मतभेद

नवी दिल्ली | New Delhi

मागच्या काही महिन्यांपासून कर्नाटकात (Karnataka) हिजाब घालण्यावरून वाद सुरू आहे. तसेच काही महाविद्यालयात हा वाद इतका टोकाचा झाला होता की यामध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर कर्नाटक सरकारने यामध्ये लक्ष घालून प्रकरण मिटवले होते. परंतु यावर कर्नाटक उच्च न्यायालयात (Karnataka High Court) खटला दाखल करण्यात आला होता...

यावर आज (दि.१३) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कर्नाटकच्या हिजाब वादावर आपला निर्णय दिला. मात्र सुनावणीवेळी दोन्ही न्यायाधीशांची (Judge) या विषयावर वेगवेगळी मते असल्याने यावर मोठे खंडपीठ बसवण्यात येणार असून या प्रकरणावर मोठ्या खंडपीठामार्फत सुनावणी (Hearing) होणार आहे.

न्यायमूर्ती सुधांशू धुलिया (Justice Sudhanshu Dhulia) आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता (Justice Hemant Gupta) यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. १० दिवस विविध याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. न्यायमूर्ती धुलिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल फेटाळला.

तसेच या प्रकरणात हिजाब (Hijab) धार्मिक परंपरांचा अत्यावश्यक भाग आहे की नाही हे महत्त्वाचे नसल्याचे मत नोंदवले. तसेच हे प्रकरण संविधानाच्या कलम १४ आणि १९ मधील निवडीच्या स्वातंत्र्याचे प्रकरण असल्याचे नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com