Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्या'लिव्ह इन रिलेशनशिप'मधून जन्मलेल्या अपत्याला मिळणार वडिलांच्या संपत्तीत वाटा

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधून जन्मलेल्या अपत्याला मिळणार वडिलांच्या संपत्तीत वाटा

नवी दिल्ली । New Delhi

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज एक ऐतिहासिक निर्णय (Historic decision) दिला असून विवाहाशिवाय (live in relationship) जन्माला आलेल्या मुलांचाही वडिलांच्या संपत्तीत हक्क (Rights to father’s property) असल्याचे म्हटले आहे…

- Advertisement -

याबाबत माहिती देतांना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, जर स्त्री आणि पुरुष (Female & male) दीर्घकाळ एकत्र राहत असल्यास अशा परिस्थितीत मूल दोघांचे असल्याचे डीएनए चाचणीत (DNA testing) सिद्ध झाल्यास ते लग्न मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या मुलांनाही वडिलांच्या मालमत्तेत हक्क (Property rights) मिळेल.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील केरळ उच्च न्यायालयाचा निर्णयही रद्द ठरवला आहे. केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) एका खटल्यामध्ये तरुणाला त्याच्या वडिलांच्या संपत्तीचा अधिकार नाकारला होता. त्यानंतर या तरुणाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल (Petition filed) केली होती. यावर आज न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तसेच २०१० मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला (live in relationship) सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती.

काय आहे प्रकरण ?

केरळमधील एका व्यक्तीने वडिलांच्या (father) मालमत्तेत वाटा न मिळाल्याने उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याने याचिका दाखल करताना म्हटले होते की, त्याला अनैतिक मुलगा सांगून वडिलांच्या संपत्तीत वाटा दिला जात नाही. यावर केरळ उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले होते की, ज्या व्यक्तीच्या मालमत्तेवर तो दावा करत आहे, त्याच्या आईने त्याच्याशी लग्न केलेले नाही, अशा परिस्थितीत त्याला कौटुंबिक मालमत्तेचा हक्क (Family property rights) समजता येणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या