MLA Disqualification Case : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली; नेमकं कारण काय?

MLA Disqualification Case : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली | New Delhi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदार (MLA) पात्र की अपात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court) येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी पडणार होती. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ठाकरे गटाची (Thackeray Group) डोकेदुखी वाढली आहे...

MLA Disqualification Case : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली; नेमकं कारण काय?
Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता 'या' तारखेला होणार सुनावणी

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (MLA Sunil Prabhu) यांनी अपात्र आमदारांच्या (Disqualified MLA) सुनावणीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narvekar) हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकेवर सुनावणी घेतांना न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा (Hearing) रोडमॅप सादर करावा अशा सूचनाही सर्वोच्च न्यायालयाने दिल्या होत्या.

MLA Disqualification Case : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली; नेमकं कारण काय?
Accident News : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली; २१ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

दरम्यान, यानंतर न्यायालयाने यावर ६ ऑक्टोबरला सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार अध्यक्षांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही (Schedule)तयार केले होते. पंरतु, आता न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात असून ९ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

MLA Disqualification Case : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली; नेमकं कारण काय?
नांदेड, छत्रपती संभाजी नगर नंतर आता नागपूरमध्ये मृत्यूचे तांडव; गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com