राज्यातील सत्तासंघर्षावर आजच 'सर्वोच्च' सुनावणी

सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता संघर्षाविषयीच्या खटल्याची सुनावणी आजच होणार आहे. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) आजच फैसला होण्याची शक्यता आहे...

राज्यातील सत्तासंघर्षाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सूचीवर घेतले गेले आहे. आधी हे प्रकरण सूचीवर नव्हते. त्यामुळे पुढील तारीख मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, आता तसे काहीही होणार नाही. रेग्यूलर न्यायालयानंतर सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालय
बंदुकीचा धाक दाखवत लुटली २५ किलो चांदी

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होत असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालय
सावधान! उत्पन्न वाढूनही रेशनधान्य घेताय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठी

या प्रमुख मुद्यांवर असणार सर्वांचे लक्ष

  • प्रकरण 5 सदस्यीय घटनापीठाकडे पाठवले जाणार का?

  • आमदार, खासदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधिमंडळ/ संसदेकडे आहे का ?

  • पक्षाचे चिन्ह, नाव संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जाणार का ?

  • गटनेते पद राजकीय पक्ष ठरवणार की विधिमंडळ पक्ष यांसह मविआने राज्यपालांकडे दिलेली 12 आमदारांची यादी योग्य की अयोग्य?

  • पक्षविरोधी कारवाया म्हणजे स्वतः मर्जीने पक्ष सोडणे म्हणता येईल का?

  • व्हीप बजावण्याचे अधिकार कोणाला?

  • नवीन गट तयार न करणे किंवा पक्ष विलीन करण्याचे पर्याय शिंदे समोर आहेत का ?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com