NCP Crisis : चिन्ह आणि पक्षाच्या नावावर आज पुन्हा सुनावणी; सर्वोच्च फैसला होणार?

NCP Crisis : चिन्ह आणि पक्षाच्या नावावर आज पुन्हा सुनावणी; सर्वोच्च फैसला होणार?

नवी दिल्ली | New Delhi

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटप्रकरणी शुक्रवारी, ६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला. तर, बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. आता पुढील सुनावणी सोमवारी, म्हणजेच आज होणार असून दोन्ही गटाकडून काय युक्तीवाद होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जुलैमध्ये अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. यानंतर आपण कोर्टात नाही तर जनतेत जाणार असे म्हणणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अजित पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्यात यावी यासाठी याचिका दाखल केली आहे.

शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमुद आहे की, पक्षाच्या विरोधात जाऊन ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. पक्षाची मान्यता नसताना मंत्रीपदाची शपथ घेण्यात आली आहे. त्यामुळे या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दुपारी चार वाजता होणार असून सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सोबतच केंद्रीय निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू झाली असून, पहिली फेरी पार पडली आहे. आता तर विधानसभा अध्यक्ष यावर सुनावणी कधी करण्यात येणार असा सवाल शरद पवार गटाकडून विचारण्यात आला आहे.

पहिल्या सुनावणीमध्ये काय झाले?

"शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या एका पत्राने नियुक्त्या होतात. हा मनमानी कारभार असून हे लोकशाहीला धरून नाही", असा गंभीर आरोप सुनावणी दरम्यान अजित पवार गटाने केला.

तर, निवडणूक आयोगासमोर शरद पवारांकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. त्यामुळे सर्व अधिकार शरद पवारांकडे आहेत. पण एक गट आम्हाला सोडून बाहेर पडला. मात्र, मूळ पक्ष आमचाच, असा दावा शरद पवारांच्या बाजूने करण्यात आला.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com