Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता सर्वोच्च न्यायालयात 'या' तारखेला होणार...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

नवी दिल्ली | New Delhi

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections to Local Bodies) आणि ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) दाखल केलेल्या याचिकांवर १ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. पंरतु, ही सुनावणी (Hearing) पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत…

- Advertisement -

Bacchu Kadu : सचिन तेंडुलकरांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांसह आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि ओबीसी आरक्षण ही दोन्ही प्रकरणे उच्च न्यायालयात (High Court) आहे. याबाबत ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटची सुनावणी झाली होती. यानंतर उद्या १ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कामकाजाच्या वेळापत्रकात या याचिकेचा समावेश नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह राज्यातील १५ महानगरपालिका, ९२ नगरपालिकांचे भवितव्य टांगणीला लागण्याचे बोलले जात आहे.

रक्षाबंधनासाठी जाताना कारचं टायर फुटलं, गाडी धरणात कोसळली; मुलीचा बुडून मृत्यू

दरम्यान, ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्यातील महानगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम (Program) अद्याप जाहीर होऊ शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीला आत्तापर्यंत अनेकदा ‘तारीख पे तारीख’ मिळत आली आहे. अशातच आता ओबीसी आरक्षणासंबंधी याचिकेवर शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा एकदा पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे या दोन्ही याचिकांवर २२ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

डेंग्यू आणि मलेरियावर वर्षभरात बाजारात लस

- Advertisment -

ताज्या बातम्या