Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याSatyendar Jain : AAPचे नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर, ३६०...

Satyendar Jain : AAPचे नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर, ३६० दिवसानंतर येणार तुरुंगाबाहेर

दिल्ली | Delhi

आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने जैन यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.  

- Advertisement -

न्यायालयाने मेडिकल अहवालाच्या आधारावर ४२ दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे, सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे २०२२ रोजी अटक केली होती. आता जैन यांना ३६० दिवसानंतर जामीन मिळाला. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

नव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा! उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार

सत्येंद्र जैन हे गुरुवारी तिहार जेलमध्ये बाथरुममध्ये कोसळले आहेत. चक्कर आल्याने ते कोसळल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर त्यांना डीडीयू रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे.

Sengol : नव्या संसद भवनात लावण्यात येणार ‘सेंगोल’… काय आहे ‘सेंगोल’चा इतिहास?

तिथे त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्यांना दिल्लीतल्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या