अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सर्व मागण्या

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार, सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या सर्व मागण्या
अनिल देशमुख

नवी दिल्ली

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh)यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख (anil deshmukh)यांची याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने (supreme court)अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. अनिल देशमुख यांच्या सगळ्या मागण्या सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत यात काहीही शंका नाही.

अनिल देशमुख
अफगाणिस्तानची सत्ता हस्तगस्त करणारे तालिबान आहे तरी काय?

अनिल देशमुख (anil deshmukh)यांनी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सक्तवसुली संचालनालयाने (ed) मनी लाँड्रिंग कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत दाखल गुन्ह्या प्रकरणी कोणत्याही दंडात्मक कारवाईतून संरक्षण मिळावं यासाठी याचिका दाखल केली होती. परंतु त्यांची एकही मागणी सुप्रीम कोर्टाने (supreme court) मान्य केलेली नाही. या याचिकेत वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने तपासाला स्थगिती द्यावी, ईडीकडून पाठवण्यात आलेले समन्स रद्द करावे, अटकेसारखी गंभीर कारवाई करण्यास मज्जाव करवा अशा या मागण्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने यातली एकही मागणी मान्य न करता अनिल देशमुख (anil deshmukh)यांना झटकाच दिला आहे. एवढंच नाही तर याबाबत सीआरपीसीच्या अनुषंगाने याचिका करावी अशी सूचनाही सुप्रीम कोर्टाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com