Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिल्यानंतर त्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्याच बाजूने निकाल आल्याचे दावे दोन्ही बाजूने होत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे.राज ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बराच गोंधळात टाकणारा आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी मला न्यायालय किंवा पोलिसांकडून नोटीस येतात. त्यातील त्यांची भाषा वाचल्यावर आपल्याला सोडलंय की अटक केली हेच कळत नाही. इतकी ती भाषा गुंतागुंतीची असते.”

Live Updates : बेकायदा सरकारचा मृत्यू अटळ, तीन महिन्यात सरकार जाणार – संजय राऊत

काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या, प्रोसेज चुकली, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता, विधीमंडळाचा गट योग्य ठरणार नाही, बाहेरचाच पक्ष राहिला पाहिजे, मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याचं काय होणार? कोर्टाचा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. भयंकर संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

Ajit Pawar : …हे स्वप्नातही पाहू नका; अजित पवारांचा सरकारवर घणाघात

“त्यांनी सांगितलं सगळी प्रक्रिया चुकली, मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट पक्ष समजला जाणार नाही, बाहेरचाच पक्ष म्हणून समजला जाईल. ही गोष्ट झाल्यावर निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं काय होणार?” असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.

मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे असं तुम्ही म्हणाला होता. आताही मुख्यमंत्र्यांना तोच सल्ला देणार का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे. आधीचे नाही राहिले त्यामुळे हे सर्व घडलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या