Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या भरपाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

दिल्ली | Delhi

करोनामुळे देशभरात अनेकांनी आपला जीव (death due to COVID) गमावला. दरम्यान करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार ही भरपाई देण्यातंही आली.

- Advertisement -

मात्र काही लोकांनी याचा गैरफायदा घेत भरपाई घेण्यासाठी खोटे दावे करत असल्याचं समोर आलं होतं. ही बाब लक्षात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आता मोठा निर्णय घेतला आहे. (fake ex-gratia claims on death of kin due to COVID)

करोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई मिळवण्यासाठी दाखल केलेल्या खोट्या दाव्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासंबधी चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. भरपाई मिळवण्यासाठी दाखल केलेल्या दाव्यांपैकी ५ टक्के दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना मिळणारी ५० हजार रुपयांची मदत दोन महिन्यात देण्यात यावी, असे आदेश सुप्रीम न्यायालयाने दिलेत.

दरम्यान, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ या चार राज्यांमध्ये दाखल झालेल्या एकूण दाव्यांपैकी ५ टक्के दाव्यांची चौकशी करण्यास सुप्रीम न्यायालयाने सांगितले आहे. दुसऱ्या लाटेत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आणि आलेले अर्ज यात बरीच तफावत असल्याने केंद्र शासनाने अर्जांची पडताळणी करावी असेही आदेश केंद्र शासनाने दिलेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या