शिवसेनेची 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली; 'या' दिवशी होणार सुनावणी

शिवसेनेची 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली; 'या' दिवशी होणार सुनावणी

नवी दिल्ली । New Delhi

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नोटिशीविरोधात शिवसेनेने (Shivsena) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्यानंतर ही याचिका न्यायालयाकडून स्वीकारण्यात आली आहे. शिवसेनेच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (ShivSena chief Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे...

एकनाथ शिंदे गटाच्या (Shinde Group) याचिकेवरील निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला इतर याचिकांसह (Petition) शिवसेनेच्या या मागणीवरही सुनावणी होणार आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील ८ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तसेच शिवसेनेचा हा अर्ज सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार होता. मात्र, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या शपथविधीसाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा (Chief Justice N. V. Ramana) सोमवारी संसद भवनात (Parliament House) असल्यामुळे हा अर्ज मंगळवारी दाखल केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई (Shiv Sena MP Anil Desai) यांनी दिली होती.

दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची अपात्रता (Rebel MLA) व त्यासंबंधित याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अपात्रतेसंदर्भात कोणतीही कारवाई न करता स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणती आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा अधिकार, या मुद्दय़ांवर सुनावणी घेणे योग्य नसल्याचा मुद्दा शिवसेनेच्या वतीने याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com