राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात झाली 'ही' सुनावणी

राज्यातील रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात झाली 'ही' सुनावणी

नवी दिल्ली | New Delhi

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि महानगरपालिकेच्या निवडणुका (Municipal Corporation) पावसाळा (Rainy season) झाल्यावर घेण्यात याव्यात या संदर्भातील विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) सुप्रीम कोर्टात केला होता. या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात न्यायाधीश खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

यावेळी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) सुनावणीवेळी म्हटले की, ज्या ठिकाणी पाऊस कमी असतो अशा ठिकाणी निवडणुका थांबवण्याची काय गरज आहे? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. तसेच जिल्हानिहाय आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम तयार करावा. असे निर्देश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग कशा पद्धतीने निवडणुका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने याअगोदरच सुनावणीवेळी राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश देण्यात आले होते की, ओबीसी आरक्षणाविना (OBC reservation) २ आठवड्यामध्ये निवडणूक प्रक्रिया जाहीर करावी. यानंतर राज्यात १४ महापालिकांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याची सध्या लगबग सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com