
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक पदवीधर निवडणुकीत( Nashik Graduate Election) शिवसेना पुरस्कृत, महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा. त्या विधानपरिषदेत शिक्षकांचे प्रश्न, जुनी पेन्शन, महागाई, बेरोजगारीवर आवाज उठवतील. त्यामुळे पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई ( Former Industries Minister Subhash Desai) यांनी केले.नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मेळावा( Mahavikas Aaghadi ) झाला. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राउत, आमदार रुतुजा लटके, आ. विलास पोतनीस, आ. आमश्या पाडवी, उमेदवार शुभांगी पाटील, सुनील बागुल, विजय करंजकर, जयंत दींडे, विलास शिंदे,दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, कोंडाजी आव्हाड,प्रेरणा बलकवडे,काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, शरद आहेर आदीसह महाविकास आघाडीचे जिल्हा व विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य व केंद्रावर सडकून टीका करत खासदार सावंत म्हनाले,सत्ताधार्यांकडून देशात मुलभूत प्रश्नांकडे दूर्लक्ष केले जात आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र ठाकरे हे चक्रव्यूह तोडून बाहेर पडतील. भाजपाने सेनेसोबत युती तोडली तेव्हा ठाकरे यांनी स्वत:च्या हिंमतीवर यांच्या छाताडावर बसून 63 आमदार निवडून आणले.नितीमुल्यांचा र्हास होतो आहे.
पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सुरु असल्याची टीका त्यांनी केली. खा.विनायक राउत म्हणाले, पक्षाशी बेइमानी करुन दुसर्याची लाचारी करणारांशी शुभांगी पाटील यांची तुलना होउ शकत नाही.मुंबई जिकण्यासाठी पंतप्रधान,केंद्रीय गृहमंत्र्यांना आणावे लागत आहे.एवढी दहशत उद्धव ठाकरे यांची असल्याचेही ते म्हणाले.