Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्याला 15 हजार लसींचा पुरवठा

जिल्ह्याला 15 हजार लसींचा पुरवठा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात अडखळत लसीकरण सुरू आहे. दररोज सरासरी आठ ते 10 हजार जणांना लस दिली जात आहे. रविवारी लसीकरण बंद असले तरी जिल्ह्याला शनिवारी 13 हजार 200 कोवीशिल्ड तर 2 हजार कोव्हॅक्सीन अशा 15 हजार 200 लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. यांचे काल वितरण झाले असून यामुळे जिल्ह्यात किमान पुढील चार दिवस लसीकरण सुरळीत सुरू राहिल, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्याचा सामना करत अडखळत लसीकरण सुरू आहे. शहर तसेच जिल्ह्यात लसींची मागणी वाढली आहे. पंरतु त्या तुलनेत लस उपलब्ध होत नसल्याने लसींचा तुटवडा जाणवत आहे. याचा शनिवारच्या लसीकरणावर परिणाम झाला होता. दरम्यान शनिवारी दिवसभरात 98 केंद्रांवर दोन्ही मिळून 7 हजार 60 जणांना लस देण्यात आली आहे. यामुळे आतापर्यंत 10 लाख 24 हजार 226 जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

गेली महिनाभरापासून लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद होती. शनिवारी शासनाकडून नाशिक जिल्ह्यासाठी 13 हजार 200 कोवीशिल्ड तर 2 हजार कोव्हॅक्सीन अशा 15 हजार 200 लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. तर यापूर्वीच काही साठा शिल्लक असल्याने आगामी 4 दिवस जिल्ह्यात सुरळीत लसीकरण सुरू राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या