महानायक अमिताभ बच्चन करोनामुक्त
मुख्य बातम्या

महानायक अमिताभ बच्चन करोनामुक्त

त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

काही दिवसापासून महानायक अमिताभ बच्चन करोनाशी लढा देत होते. मात्र आता अमिताभ करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "मी कोविड चाचणी केली आहे.माझा डिस्चार्ज झाला आहे. मी आता घरातच विलागीकरनमध्ये राहणार आहे. सर्वशक्तिमान देवाची कृपा, बाबूजींचा आशीर्वाद, जवळचे आणि प्रिय मित्र तसेच चाहत्यांची प्रार्थना व दुआ आणि नानावटी येथील उत्कृष्ट काळजीमुळे मला हा दिवस पाहणे शक्य झाले."

Deshdoot
www.deshdoot.com