'सुपर ५० उपक्रम' : तालुकानिहाय सुधारित परीक्षा केंद्र यादी जाहीर

'सुपर ५० उपक्रम' : तालुकानिहाय सुधारित परीक्षा केंद्र यादी जाहीर

नाशिक। प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेतर्फे ( Zilla Parishad Nashik )जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सन २०२२-२३ मध्ये अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाचे उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. ११ वी विज्ञान शाखेत प्रवेशित निवडक विद्यार्थ्यांकरिता जेईई व सीईटी या व्यावसायिक प्रवेश परीक्षेकरिता 'सुपर ५०' हा उपक्रम ( Super 50 Campaign )राबविण्यात येणार आहे. 'सुपर ५०' या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थी निवडीकरिता आयोजित प्रवेश पूर्व निवड चाचणी परीक्षा घेण्यात येणार असून, यासाठी परीक्षा केंद्रांसंदर्भात तालुकानिहाय बदल करण्यात आला आहे.

या उपक्रमासाठी बुधवार दि.९ नोव्हेंबरपर्यंत 3250 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.गुरुवार दि.10 नोव्हेंबर नाव नोंदणीसाठी अखेरची मुदत आहे. दोन वर्षासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर असून यात विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधांचा समावेश आहे. प्रति विद्यार्थ्यासाठी एका वर्षाकरिता 50 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

या ' सुपर ५० ' नावीन्यपूर्ण प्रवेशपूर्व निवड चाचणी परीक्षा शनिवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षेकरिता यापूर्वी तालुकानिहाय नियोजन करण्यात आले होते. परंतु, या उपक्रमास विदयार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता व आवश्यक सोयीसुविधा, दळणवळणाची विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन यापूर्वी निश्चीत करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

त्यामुळे शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पात्र विद्यार्थी, पालक यांनी झालेला बदल लक्षात घ्यावा. सर्व शाळांनी आपल्या स्तरावर या योजनेस पात्र विद्यार्थी वंचित राहू नये याकरिता पात्र विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

तालुकानिहाय सुधारित परीक्षा केंद्र यादी

- संपर्क क्रमांक, मुख्याध्यापकांचे नाव,सुधारित परीक्षा केंद्र शाळेचे नाव खालीलप्रमाणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com