<p><strong>सर्व छायाचित्र : सतीश देवगिरे</strong></p><p>उन्हाळ्याची चाहुल लागल्यानंतर नाशिककरांच्या सवयी बदलू लागल्या आहेत. टोप्या, रुमालांची दुकाने गजबजू लागली आहे. थंड शीतपेय व रसवंती गृहाकडे नाशिककर वळू लागले आहेत. एकंदरीत बाजारपेठेचे स्वरुप व नागरिकांचा पोशाखही बदलला आहे.</p>.<p>जिल्ह्यात साधारणपणे मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पारा वाढायला सुरुवात होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पारा ३६ अंशावर पोहचत असतो, मात्र यंदा फेब्रुवारी महिन्याचा शेवटच्या तर मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा ३५-३६अंशावर पोहचला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळे, निंबूसरबत, ताक यांची मागणी वाढते. आता शहरांतील रस्त्यांवर या गाड्या दिसू लागल्या आहेत. दुपारी रस्त्यांवरील वाहतूक व वर्दळ कमी झाली आहे.</p>