
मुंबई | Mumbai
साठ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी व गायिका सुलोचना चव्हाण (Lavani Empress Sulochana Chavan) यांचे वयाच्या ९२ वर्षी वृद्धपकाळाने मुंबईतील फणसवाडी येथील राहत्या घरी निधन (Passed Away) झाले आहे...
मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात सुलोचना चव्हाण यांनी श्रोत्यांना वेगळीच भूरळ घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता मरीन लाईन्सच्या (Marine Lines) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (funeral) होणार आहेत.