कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या

कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या

ताहाराबाद । वार्ताहर Taharabad

बागलाण तालुक्यातील ( Baglan Taluka ) मोहळांगी येथील शेतकरी पत्नीने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

लिलाबाई हुसन साबळे (60, रा. मोहळांगी) हे त्या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. हुसन गोविंदा साबळे यांनी हरणबारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून एक लाख पस्तीस हजार कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड होत नव्हती. शेतीतून विविध संकटामुळे अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने तसेच यंदा कांदा पिकाला अपेक्षित भाव नसल्याने कांदा चाळीत सडला.

पावसाचे प्रमाण अधिक असल्याने खरीप पिकांचे उत्पादन धोक्यात आले यामुळे कर्जाची यंदाही परतफेड करणे शक्य होणार नसल्याचे चित्र समोर असतांना सोसायटीकडून कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे लिलाबाई वैफल्यग्रस्त होत्या. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी पती व मुलगा गेले असताना लीलाबाई यांनी विषारी औषध सेवन केले.

त्यांना तात्काळ उपचारासाठी आलियाबाद, सटाणा, मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. चार दिवस यांनी मृत्यूशी झुंज दिली मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. मालेगाव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com