आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

आश्रम शाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या

पेठ l प्रतिनिधी Peth

आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळा (Ashram Schools of Tribal Development) चोळमुख ( Cholmukh )ता. पेठ येथील दहावीत शिकणारी विद्यार्थ्यीनी भारती महादू बेंडकोळी (१६) राहणार राऊतमाळ ( महादेव नगर) ता. त्र्यंबकेश्वर हिने आज पहाटेच्या सुमारास  आश्रम शाळेच्या  छताला असलेल्या पंखा अडकवण्याचा हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide ) केली. 

येथील स्री अधिक्षिका श्रीमती डावखर यांना ही माहिती मिळताच त्यांनी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांना माहिती दिली . पाटील यांनी तात्काळ हरसूल पोलीस ठाण्याशी संपर्क करून घडलेल्या घटनेची खबर दिली.

सदरील मृतदेहाचे हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.आत्महत्याचे कारण अद्याप पर्यंत समजले नसुन आदिवासी विकास आश्रम शाळांतील भोंगळ कारभार समोर आला आहे.

हरसुल पोलीस ठाण्यात ( Harsul Police Station )याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन या बाबत हरसूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक झिरवाळ व सहाय्यक पोलीस निरीक्षक जी एल वारुळे पो.हवा.बोंबले आदी अधिक तपास करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com