मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | Mumbai

येथे मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting)सुरु असताना एका तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) असून बापू नारायण मोकाशी असे या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारा हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले असून त्याने प्रेम प्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सुदैवाने मंत्रालयाला लावलेल्या संरक्षक जाळीमुळे (Protective Netting) मोठा अनर्थ टळला. हा तरुण वरून पडल्यानंतर जाळीत अडकल्याने त्याचे प्राण वाचले आहे. या सर्व प्रकारामुळे काही काळ मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com