नाशिकरोड सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

येथील मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसापासून शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली आहे....(Suicide attempt by prisoner in nashikroad central jail)

सुनील भानुदास बोरसे (Sunil Bhanudas Borase) हा कैदी गेल्या काही दिवसापासून मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) शिक्षा भोगत आहे. नैराश्यात गेल्यामुळे त्याने कारागृहातील मंडल क्रमांक सात यार्ड नंबर एक सर्कल नंबर 1 व बॅरेक क्रमांक पाच या ठिकाणी त्याने जिन्याच्या शौचालयाच्या छतावर जाऊन चादर फाडून त्याची दोरी बनवून खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Suicide attempt by prisoner in nashikroad central jail)

सदरची घटना कारागृह कर्मचारी व अधिकाऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी सदर कैद्याला हटकले. दरम्यान, या घटनेप्रकरणी कारागृहाचे कर्मचारी शेख युनूस सांडू यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्याय दे व सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक हांडोरे या करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com