Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआमदार कांदेचा थेट मंत्री भुजबळांवर वार, पालकत्वच काढण्याची मागणी

आमदार कांदेचा थेट मंत्री भुजबळांवर वार, पालकत्वच काढण्याची मागणी

नांदगावमधील पूरस्थितीबाबत झालेल्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)आणि आमदार सुहास कांदे (suhas kande)यांच्यात सुरु असलेला वाद वाढतच आहे. आज पत्रकार परिषद घेऊन आमदार सुहास कांदे (suhas kande) यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यांवर टीकेच्या फैरी झाडल्या. आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांचे पालकमंत्री पद काढण्याची मागणी केली. आमची ही मागणी असून त्यावर निर्णय मुख्यमंत्री व शरद पवार घेतील, असे त्यांनी सांगितले.

Video : आमदार कांदेंना छोटा राजनच्या नावे धमकी ही केवळ ‘स्टंटबाजी’; अक्षय निकाळजे म्हणाले…

- Advertisement -

पत्रकार परिषदेत काय म्हणाले आमदार कांदे…

  • भुजबळांची धमकी देण्याची पार्श्वभूमी आहे. यापुर्वी श्रीलंकेहून फोन आला होता. तेव्हा हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे देण्यात आले होते.

  • आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व संबंधितांना हे सर्व प्रकरण सांगितले आहे.

  • आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना ज्यांनी कारागृहात टाकले त्यांच्यांत आणि आमच्यात हा वाद आहे.

  • भुजबळसाहेब भाई विद्यापीठाचे विद्यार्थी नाही तर प्राचार्य आहेत.

  • नाशिक जिल्ह्यात शिवसेनेवर अन्याय होत आहे…

  • जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भ्रष्टाचार झाला आहे. यावर कधीही भुजबळांशी चर्चा करण्यास आपण तयार आहोत.

  • छगन भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचं भांडण नाही. 12 कोटी निधी आला यातील 10 कोटी ठेकेदारांना भुजबळांनी वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसतांना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या