नियोजन समितीत आमदार कांदे यांचे तुर्त समाधान, पण...

नियोजन समितीत आमदार कांदे यांचे तुर्त समाधान, पण...
भुजबळ-कांदे

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (suhas kande)आणि पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांच्यांतील निधी वाटपातील वादामुळे चर्चेत आलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज झाली. पालकमंत्री भुजबळांच्य‍ा (Chhagan Bhujbal)अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी नियोजन भवनबाहेर आ.कांदे समर्थकांची गर्दी झाली. बैठकीनंतर आमदार कांदे यांनी आपले तुर्त समाधन झाले असून कारवाईनंतरच पुढे बोलता येईल, असे सांगितले.

भुजबळ-कांदे
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

बैठकीत सुहास कांदे बैठकीत आक्रमक झाले. नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. या प्रकरणावर एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती असमान निधी वाटपासंदर्भातील आरोपांची चौकशी करणार आहे. समितीचे अध्यक्ष पालकमंत्री छगन भुजबळ राहणार असून त्यात पाच आमदारांचा समावेश करण्यात येणार आहे.

यामुळे थांबला निधी...

शासनाकडून नियोजन समितीला फक्त १० टक्केच निधी आला. यामुळे वाटप झाले नाही. आता ऑक्टोंबरपासून निधी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर निधीचे वाटप सर्वांना समप्रमाणात होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

आमदार कांदे म्हणाले...

बैठकीनंतर आमदार कांदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, या प्रकरणी समिती नेमल्यामुळे तुर्त आपले समाधान झाले आहे. परंतु या समितीच्या अहवालनंतरच पुढे काय होईल, ते बोलता येईल.

नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी याआधी त्यांच्या मतदारसंघाला पालकमंत्री भुजबळ यांनी पुरेसा जिल्हा नियोजन निधी दिला नसल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बैठकीमध्ये मागील २०२०-२१ मधील मंजूर कामांना मान्यता देऊ नये. कारण हे प्रकरण न्यायलयीन बाब आहे, अशी मागणी आमदार कांदे यांनी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com