Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याउपपदार्थ निर्मितीतून ऊसाला ज्यादा भाव शक्य

उपपदार्थ निर्मितीतून ऊसाला ज्यादा भाव शक्य

निफाड। प्रतिनिधी Niphad

शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करून ऊसाला Sugarcane अधिक उतारा कसा मिळेल यासाठी दर्जेदार उत्पादनावर भर द्यावा. तसेच कारखानदारी यशस्वी होण्यासाठी केवळ साखर उत्पादन न करता इथेनॉल, वीज आणि हायड्रोजनचे उत्पादन करावे. त्यामुळे शेतकर्‍याच्या ऊसाला देखील प्रतिटन 200 रु. जादा भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही.

- Advertisement -

कर्मवीर काकासाहेब वाघांनी साखर संघाचे नेतृत्व केले आहे. आज त्यांनी उभा केलेला कारखाना बंद पडतो. बाहेरील कारखानदार इथल्या शेतकरी व कामगारांची लूट करतात हे न शोभणारे आहे. त्यामुळे हा कारखाना चालू करण्याची हिम्मत दिलीप बनकरांनी दाखविली. त्यांना तुम्ही साथ द्या असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार NCP’s president MP Sharad Chandra Pawar यांनी केले आहे.

आमदार दिलीप बनकर यांच्या स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेल्या काकासाहेबनगर येथील कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याच्या Karmaveer Kakasaheb Wagh Cooperative Sugar Factory 39 व्या गाळप हंगाम शुभारंभाप्रसंगी पवार बोलत होते. कर्मविर काकासाहेब वाघ यांनी एखादी गोष्ट ठरविली तर ती राज्याचे नेतृत्व देखील मान्य करीत असे असे पवार यांनी उदाहरण देत पटवून दिले.

मात्र त्यांनीच उभा केलेला कारखाना बंद पडतो. बाहेरचे कारखानदार शेतकरी व कामगारांचे पैसे थकवितात हे न शोभणारे आहे. मात्र हा बंद पडलेला कारखाना चालू करण्याचे धाडस दिलीप बनकरांनी दाखविले आहे. बाजार समिती, पतसंस्था उत्तम चालविण्याचे कसब त्यांचेकडे आहे. त्यामुळे ते हा कारखाना निश्चित व्यवस्थित चालवतील. ज्याप्रमाणे रासाका सुरू केला तसाच निसाका देखील सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी येथील प्रमुख लोक माझेकडे आले तर त्यांचेशी बोलून मार्ग काढू व कारखाना कसा चालू करायचा बघू असेही पवार म्हणाले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कारखाने हे आपल्या देशाचे दागिने आहेत. त्यातून धरणे झाली, रस्ते झाले पण आज कारखाने विकायचे काम सुरू आहे. काकासाहेब वाघ यांनी कारखाना उभा केला. दिलीपकाकांनी तो सुरू केला. केंद्र सरकारवर आसूड ओढतांना भुजबळ म्हणाले की, आमचे कारखाने, बँका एक नंबरच्या होत्या पण चुकीच्या लोकांच्या हातात केंद्रातील सत्ता दिल्याने आज काय अवस्था झाली. आम्ही दिलीप बनकरांच्या मागे खंबीर उभे आहोत. कारखाना चांगला चालू द्या. पायात पाय घालू नका. आता बाजार समिती निवडणूक लागली. ती देखील दिलीप बनकरांच्या ताब्यात राहू द्या. कारखाना हा शेतकर्‍यांचा आहे तो निट चालू द्या असे भुजबळ म्हणाले.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले की, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. आम्ही मदत जाहिर केली. 3804 कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये शेतकरी हिताचे निर्णय होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करतो. मात्र त्यास यश येत नाही. त्यामुळे शरद पवारांनी केंद्राशी संपर्क साधला तर मार्ग निघू शकेल. 38 लाख शेतकर्‍यांनी विमा कंपन्यांकडे आमचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली आहे असेही भुसे म्हणाले. बंद पडलेला हा कारखाना पुन्हा सुरू होत असून या कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे असेही भुसे म्हणाले.

आपल्या प्रास्ताविकात आमदार दिलीप बनकर यांनी वीज प्रश्नाला हात घालत शेतकर्‍यांसाठी रात्री नाही तर दिवसा 12 तास वीज द्यावी. तालुक्यातील उपसा जलसिंचन योजना कर्जात असून 80 ते 85 बंधारे दुरुस्तीचा प्रस्ताव दिला आहे त्याला मंजुरी मिळावी. येथील कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी चार वेळा प्रयत्न केले पण अपयश आल्याचे सांगून संयम ठेवला पाहिजे हे भुजबळांकडून शिकलो तर ध्यास आणि संघर्ष केला पाहिजे हे शरद पवारांकडून शिकल्याचे बनकर म्हणाले. तसेच कारखाना चालू करण्यासाठी 35 ते 40 कोटी रुपये खर्च होणार असून दोन वर्ष कारखाना तोट्यात चालवावा लागणार आहे. तसेच दोन लाखापुढील कर्ज माफ झाले पाहिजे व ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये मदत 31 मार्च पुर्वी द्यावी असे प्रतिपादन केले. यावेळी श्रीराम शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शरद पवार यांचे हस्ते कर्मविर काकासाहेब वाघ पुतळ्याचे पूजन, त्यानंतर कारखाना कार्यालयाचे उद्घाटन व गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नितिन पवार, आमदार सरोज आहिरे, आमदार किशोर दराडे, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मविप्र सरचिटणीस नीलिमाताई पवार, माणिकराव बोरस्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, हेमंत टकले, दत्तात्रय पाटील, पंढरीनाथ थोरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, हंसराज वडघुले, तानाजी बनकर, सुरेशबाबा पाटील, राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, सचिन पिंगळे, शरद आहेर, राजाराम शेलार, डी.के. जगताप, सिद्धार्थ वनारसे, सुरेश कमानकर, नाना महाले, अमृता पवार, डी.बी. मोगल, रामभाऊ माळोदे, गफ्फार शेख, मंदाकिनी बनकर, अलका बनकर, गणेश बनकर, बाळासाहेब बनकर, सुरेशदादा खोडे, सोहनलाल भंडारी, प्रांत डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, डीवायएसपी सोमनाथ तांबे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या