Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यासभारंभ व गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी अन् कारवाई

सभारंभ व गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी अन् कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात मागील वर्षात करोना प्रादुर्भावांच्या टायर वन मधील मोठ्या शहरात ज्या प्रमाणात करोना प्रादुर्भाव झाला अशा ठिकाणी आता पुन्हा करोना रुग्णांची वाढ होत आहे. अशीच स्थिती टायर टु मध्ये असलेल्या नाशिक जिल्हा व महापालिका क्षेत्रात होण्याची शक्यता असुन जिल्ह्यात करोना रुग्णांत वाढ होऊ लागले आहे. या पार्श्वभूमी काही निर्बंध लावणे गरजेचे असुन जिल्हाधिकार्‍यांकडुन येणार्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार पुढच्या काही दिवसात जिल्हाधिकारी, महापालिका व पोलीस हे सुंयक्तरित्या लग्न सोहळे, सभारंभ व गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी करुन कारवाई करणार असल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राज्यातील मोठ्या शहरात आणि नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या जानेवारी महिन्यात नवीन रुग्णांची संख्या घटल्यानंतर आता चालु फेब्रुवारी महिन्यात रुग्णांची संख्या वाढत रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासंदर्भात बोलतांना आयुक्त जाधव म्हणाले, राज्यातील टायर वन मधील मुंबई, पुणे, नागपुर या शहरात गेल्या गत वर्षाच्या मधल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग झाला. याच शहरात आता दररोज 400 ते 500 नवीन रुग्णांची भर पडत आहे. यानंतर टायर टु असलेल्या नाशिक शहरात जानेवारी व फेब्रुवारीत रुग्ण वाढत असुन मायनस असलेल्या नाशिक शहरातील उपचार घेणार्‍या रुग्णांचा आकडा 600 पर्यत गेला आहे. टायर वनप्रमाणे लाट नाशिक शहरात येऊ शकते.

पुर्वी प्रमाणे स्थिती येऊन नये म्हणुन आपल्याला कडक निर्बंध सुरू केले तर लॉकडाऊनची परिस्थती येणार नाही. सध्याची स्थिती पाहता पोलीस, मनपा व जिल्हाधिकारी यांना करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी सक्षम पाऊले उचलावी लागणार असुन सेमीलॉकडाऊन स्वरुपात निर्बंध लावण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडुन मार्गदर्शक सुचना लवकरच जारी होणार आहे. यानुसारच लग्न – सभारंभ व गर्दीच्याठिकाणी अचानक तपासणी करुन संबंधीतांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नाशिक शहराची लोकसंख्या 20 लाख असुन इतक्या मोठ्या शहरात 4 ते 5 हजार कर्मचारी -अधिकारी करोनासंदर्भातील शिस्त लावून शकणार नाही, असे सांगत आयुक्त म्हणाले, सध्या लग्न सोहळ्यासाठी 100 जणांची परवानगी असतांना यात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असुन मास्क वापरत नाही, बॅक्वेट हॉलमध्ये नियम पाळले जात नाही.

मास्क, सॅनियाईजरचा वापर व वारंवार हात धुवणे अशा त्रिसुत्रीचे पालन केले जात नाही. कोविशिल्ड लसीकरण हे आरोग्य सेवकांना नंतर फ्रंट लाईन वर्कर यानंतर पन्नास वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाच्या दोन डोस करता 1 वर्षाचा कालावधी जाणार आहे. हा कालावधी पाहता नागरिकांनी आपल्या शहरासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी तरी त्रिसुत्रीची शिस्त लावावी असे आवाहनही आयुक्तांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या