Sunday, April 28, 2024
Homeजळगावसुनसगाव येथील सुदर्शन पेपर मिलला भीषण आग !

सुनसगाव येथील सुदर्शन पेपर मिलला भीषण आग !

सुनसगाव Sunasgaon ता भुसावळ वार्ताहर

सध्या ऊन्हाची तिव्रता (Heat intensity) मोठ्या प्रमाणात जाणवत असताना येथून जवळच गोजोरे रस्त्यावर असलेल्या सुदर्शन पेपर मील (Sudarshan Paper Meal) मध्ये दि.२८ रोजी सकाळी १० वाजे दरम्यान कागदाच्या गठानी (paper) मध्ये अचानक आग (fire) लागली असता शेतीशिवार परिसरातील वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात येत नसल्याने माहिती पोलिसांना देण्यात आली तसेच अग्निशामक (Firefighters) दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले जवळपास ५० बंबांनी आग आटोक्यात (Fire under control) आणली.

- Advertisement -

यावेळी विज वितरण कंपनीने ऐन वेळी शेती शिवारातील विज सुरू केल्याने शेती पंपावरुन अग्निशामक बंब भरण्यात आले तसेच शेजारच्या सर्व कंपन्यांच्या मालक व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.या बाबत माहिती अशी की , येथील सुदर्शन पेपर मील मध्ये डुप्लेक्स नावाचा महागडा पेपर तयार करण्यात येतो या पेपर ला तयार करण्यासाठी बाहेरुन कच्चा माल बोलवण्यात येतो या कच्च्या मालाच्या गठानी मशिनीव्दारे पॅक केलेल्या असतात आणि या गठानी उन्हाच्या तिव्रतेने आपोआप पेट घेतात त्यामुळे आग लागते आणि आटोक्यात येते .

मात्र दि.२८ रोजी कंपनीचे काम बंद होते वरचे वर कामे सुरू असल्याने कामगार शेड मध्ये काम करीत होते परंतु वाऱ्याचा जोर जास्त असल्याने आग आटोक्यात आणणे मुश्किल होत होते शेवटी भुसावळ , जळगाव ,दिपनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले .या आगीत कंपनीचा ५ ते ६ कोटी रुपयांचा तयार पेपर व गोडाऊन अग्नीच्या भक्षस्थानी गेले व इतर २ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे .

घटनास्थळी भेट

आगीची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार ,पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचे सुरज पाटील , तालुका पोलीस स्टेशनचे गणेश गव्हाळे , जगदिश भोई , विशाल विचवे , चालक राजू काझी , विज वितरण कंपनीचे श्री धांडे साहेब , सुनसगाव विज वितरण कंपनीचे अभियंता देवयानी शेटे व विज कर्मचारी ,तलाठी जयश्री पाटील तसेच शक्ति पेपर मील चे मालक व कर्मचारी , जे डी पॅकेजिंग कंपनीचे मालक व कर्मचारी , सरस्वती पेपर चे संचालक, तसेच जळगाव एम आय डि सी मधील कंपनी चे संचालक तसेच सुनसगाव, गोजोरा व पंचक्रोशीतील पोलीस पाटील व राजकीय पदाधिकारी व पत्रकार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास सात तास लागले असले तरी पुर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी दोन दिवस लागणार असल्याने पेटलेल्या गठानी तोडा पाडून एका बाजूला करण्यात आल्या आहेत. आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात आग लागल्याची नोंद करण्यात आली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.तर तलाठी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहेत.

आग आटोक्यात आणण्यासाठी कंपनीचे सर्व अधिकारी व कर्मचारी जिवाची पर्वा न करता कामाला लागलेले होते जो तो कर्मचारी धावपळ करताना दिसत असून ‘ अरे देवा , हे काय झालं! असे शब्द प्रत्येकाच्या मुखातून बाहेर पडत होते. कंपनीचे संचालक राजीव चौधरी आपल्या नजरेसमोर होणार नुकसान पाहत धावपळ करताना दिसत होते. सुदैवाने जिवीतहानी टळली . जवळपास ६५० टन तयार पेपर आणि १२०० टन कच्चा माल व १०० टन कोळसा तसेच ३५ क्विंटल पेपर तयार करण्यासाठी लागणारी पावडर व शेड चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या