
नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
भारत सातत्याने आपली लष्करी ताकद ( military strength)वाढवत आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्यासाठी भारत आपली क्षेपणास्त्र क्षमता (Missile capability )सुधारण्यात गुंतला आहे. यातच भारतीय हवाई दलाने ब्रह्मोस हवाई क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण ( Brahmos Air Missile) केले असून विस्तारीत क्षमतेची यशस्वी चाचणी केली आहे.
बंगालच्या उपसागरातील सुखोई-30 एमकेआय विमानातून लक्ष्यावर अचूक मारा करून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सुखोई विमानाचे प्रक्षेपण ठरल्याप्रमाणे झाले आणि क्षेपणास्त्राने थेट बंगालच्या उपसागरातील लक्ष्यावर हल्ला केला. हे क्षेपणास्त्र 450 किमी लांब असलेल्या लक्ष्यालाही भेदू शकते.
सुखोई-30 एमकेआय विमानाच्या चांगला कामगिरीसह हवेतून प्रक्षेपित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची विस्तारीत क्षमता भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढवणार आहे. यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. भारतीय लष्कराच्या अंदमान-निकोबार द्वीपसमूह कमांडने ही चाचणी केली होती.