यशस्वी विद्यार्थी हीच शिक्षकांंच्या कार्याची मोठी पावती - डॉ. बालाजीवाले

रोटरी कल्चरल फेस्टला उत्साहात प्रारंभ
यशस्वी विद्यार्थी हीच शिक्षकांंच्या कार्याची मोठी पावती - डॉ. बालाजीवाले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिक्षकांनी निरपेक्ष वृत्तीने दिलेल्या योगदानातुन विद्यार्थी घडतात.त्यांचे ऋण कधीही विसरता येत नाही.यशस्वी कर्तुत्ववान विद्यार्थी हीच त्यांच्या कार्याची मोठी पावती असते,असे गौरवोद्गार दै. 'देशदुत'च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी आज येथे काढले.

बाबाज थिएटर्सच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड (Rotary Club of Nashik Road) यांच्या तर्फे आजपासुन 'रोटरी कल्चरल फेस्ट'चा (Rotary Cultural Fest) प्रारंभ झाला. तत्त्पुर्वी 'रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड' तर्फे २४ शिक्षकांचा 'नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड' देऊन यथोचीत सन्मान डॉ बालाजीवाले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा वर्षा जोशी होत्या.सचीव ज्ञानेश वर्मा, रोचना रॉय, सीमा पछाडे, धनंजय जोशी, वि.भा.पाटील, प्रशांत बिसोई, डॉ. किवंदे यावेळी उपस्थीत होते. सुत्रसंचालन हेमंत शिधये व फिरदोस कापडीया यांनी केले.परीचय ऍड दिनेश शिंदे यांनी करुन दिला. आभार सैमीत्र दास यांनी मानले. स्वागत गित अश्‍वीनी सरदेशमुख यांनी म्हटले.

यांचा झाला गौरव

सुरेख कान्हे, उज्वला महाजन, जयश्री थेटे,ज्योती अहीरे, नेहा पिल्लई,अंंजु क्रीश्‍नानी, योगीता गायधनी, निर्मला पवार, मुरलीधर हिंदे, नरेश जगताप,मनीषा सेंद्रे, जितेंद्र भावसार, अनुपमा घोडके, मनीषा काळकर, प्राजक्ता पंचाक्षरी, कैलास अरोटे, हर्शवर्धन बोर्‍हाडे, मनीराम अहीरे, बालु गोडसे,गोशल पिरे मनोज अवचिंते, प्रकाश शिवडे, मोनीका कोरडे, वैशाली टिळे यां शिक्षकांचा यथोचीत नेशन बिल्डर अर्वार्ड देऊन सन्मान यावेळी करण्यात आला.

रोटरी कल्चरल फेस्टला प्रारंभ

रोटरी कल्चरल फेस्टचे औपचारिक उदघाटन बाबाज थिएटर्सचे संस्थापक तथा सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य प्रशांत जुन्नरे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी मंचावर रोटरी क्लब नाशिकरोडच्या अध्यक्षा वर्षा जोशी,क्लब सेक्रेटरी ज्ञानेश वर्मा, कुणाल शर्मा,रोचना शर्मा उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर गोल्डन व्हॉइस स्टुडिओ तर्फे सुमधुर शास्त्रीय रागांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.यात गायक ज्ञाानेश वर्मा,अश्विनी सरदेशमुख,जाणिश शेख,बालगायक स्वरा थोरात यांनी सहभाग नोंदविला. तर संगीत संयोजन अमोल पाळेकर यांनी केले. अनिल धुमाळ,रागेश्री धुमाळ अभिजित शर्मा,देवानंद पाटील व बालकलाकार चैतन्य पाळेकर यांनी साथ दिली. सुत्रसंचलन मनिषा विसपुते यांनी केले.

हा पाच दिवसांचा खास सांस्कृतिक महोत्सव १८ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५.३० ते रात्री ९ या कालावधीत परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सादर केला जाईल. गुरुवारी, १५ सप्टेंबर रोजी फोर्थ वॉल स्कूल ऑफ ड्रामा तर्फे रोहित पगारे लिखित व दिग्दर्शित मृतकाचे नांव काय, या सामाजिक व विनोदी नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com