गुलाटींचा थक्क करणारा प्रवास : टांगा चालक ते २००० कोटींचे साम्राज्य

गुलाटींचा थक्क करणारा प्रवास : टांगा चालक ते २००० कोटींचे साम्राज्य

MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. उद्योग क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे २०१९ साली त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म विभूषण प्रदान करुन सन्मानित करण्यात आले होते. कधी दिल्लीच्या रस्त्यांवरुन टांगा चालवणाऱ्या गुलाटी यांनी २००० कोटींचे साम्राज्य उभारले. जाणून घेऊ त्यांची यशोगाथा...

महाशय धर्मपाल गुलाटी यांचे जुने दुकान
महाशय धर्मपाल गुलाटी यांचे जुने दुकान

शिक्षण पाचवीत सोडले

महाशय धर्मपाल गुलाटी यांचे वडील चुन्नीलाल सध्याच्या पाकिस्तानातील सियालकोट इथे राहत होते. चुन्नीलाल यांनी १९१९ साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. महाशय धर्मपाल यांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु महाशय धर्मपाल यांचे अभ्यासात मन लागले नाही. १९३३ मध्ये पाचवीत असताना त्यांनी शिक्षणास रामराम ठोकला.

पत्नीसोबत महाशय धर्मपाल गुलाटी
पत्नीसोबत महाशय धर्मपाल गुलाटी

असे पडले MDH नाव

शिक्षण सोडल्यानंतर वडिलांनी महाशय धर्मपाल यांना एके ठिकाणी कामास लावले. परंतु तेथेही त्यांचे मन लागेना. एकानंतर एक अनेक नोकऱ्या त्यांनी सोडल्या. यामुळे वडिलांच्या चिंतेत भर पडली. अखेरी सियालकोटमध्ये त्यांच्यासाठी मसाल्यांचे दुकान सुरु करुन दिले. हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता. हे दुकान चांगले चालू लागले. पंजाबीत त्याचे नाव महाशियां दी हट्‌टी (महाशय की दुकान) होते. त्याचेचे शार्टकट नाव MDH आहे.

परिवारासोबत महाशय धर्मपाल गुलाटी.
परिवारासोबत महाशय धर्मपाल गुलाटी.

फाळणीनंतर दिल्लीत

सर्व काही व्यवस्थित सुरु असतांना भारत-पाकिस्तानची फळणी झाली. सियालकोट पाकिस्तानात गेले. मग गुलाटी परिवार सर्व काही सोडून सप्टेंबर १९४७ मध्ये दिल्लीत आले. तेव्हा महाशय धर्मपाल यांचे वय २० होते. फाळणीचे दु:ख त्यांना चांगलेच माहीत होते. कारण सियालकोटमध्ये सर्व काही सोडून अाता नव्याने सुरुवात करायची होती.

टांसासौवत महाशय धर्मपाल गुलाटी.
टांसासौवत महाशय धर्मपाल गुलाटी.

टांगाचालक म्हणून केले काम

खिशात फक्त १५०० रुपये होते. परिवार चालवणे अवघड होते. त्यामुळे ६५० रुपयांमध्ये त्यांनी एक टांगा घेतला. दिल्लीतील रस्त्यावरुन कुटुंब चालवण्यासाठी त्यांनी टांगा चालवण्याचे काम केले. एका प्रवाशाकडून दोन आणे भाडे ते घेत होते. थोडे पैसे जमल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला.

महाशय धर्मपाल गुलाटी यांचे दिल्लीतील जुने दुकान
महाशय धर्मपाल गुलाटी यांचे दिल्लीतील जुने दुकान

असा उघडला पहिला कारखाना

धर्मपाल यांचा व्यवसाय चालू लागला. मग त्यांनी दिल्लीतील कीर्तिनगरात पहिला कारखाना सुरु केला. आजमितील MDH मसाले भारतात सर्वात प्रसिद्ध आणि त्यातही लाल तिखट आणि काश्मीरी तिखट देखील खूप प्रसिद्ध आहेत. भारतात त्यांचे मसाल्यांच्या १५ कारखाने आहेत. हजारच्यावर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढे मोठे जाळे एमडीएचने विस्तारलेले आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते.

राजकपूरसोबत महाशय धर्मपाल गुलाटी
राजकपूरसोबत महाशय धर्मपाल गुलाटी

सर्वात श्रीमंत सीईओ

केवळ पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या महाशय धर्मपाल गुलाटी यांनी बड्या उद्योगपतींना मागे टाकत २०१७ मध्ये देशातील सर्वात श्रीमंत सीईओ होण्याचा मान पटकावला होता. 'एमडीएच'ची वार्षिक उलाढाल २००० कोटींच्याही वर आहे. गुलाटी हे त्यांच्या वैयक्तिक कमाईतील ९० टक्क्यांहून अधिक हिस्सा दान म्हणून द्यायचे.

चित्रपट क्षेत्राशी होते नाते

महाशय धर्मपाल गुलाटी यांचे बॉलीवूडशी चांगले नाते होते. अगदी राजकपूरपासून आजच्या कलाकारापर्यंत त्यांचे सर्वांशी संबंध होते. दु:ख त्यांनी खूप जवळून पाहिले. यामुळे दुसऱ्यांच्या मदतीसाठी ते नेहमीच तयार होते. त्यांनी महाशय चुन्नीलाल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्ट अतंर्गत त्यांनी शाळा, रुग्णालय व आश्रम बनवले. गरीब, गरजूंची मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com