गरुडझेप स्पोर्ट क्लबच्या ईश्वरीची गगनभरारी

गरुडझेप स्पोर्ट क्लबच्या ईश्वरीची गगनभरारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक (nashik) येथील विभागीय क्रीडा संकुल (Departmental Sports Complex) आडगाव (Adgaon) येथे आयोजित इंडिया तायक्वांदो राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत (India Taekwondo National Ranking Competition) ईश्वरी निलेश सोनवणे (Ishwari Nilesh Sonawane) हिने 44 किलो वजन गटात कॅडेट मध्ये सुवर्णपदक (Gold medal) पटकावले असून ईश्वरी च्या माध्यमातून गरुड झेप स्पोर्ट्स क्लबने (Garud Zap Sports Club) आपली यशाची परंपरा निरंतर ठेवली.

विभागीय क्रीडा संकुल नाशिक (Divisional Sports Complex Nashik) येथे दि 11 जून ते 14 जून दरम्यान इंडिया तायकांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये भारतभरातून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

या स्पर्धेदरम्यान औरंगाबाद (Aurangabad) येथील गरुडझेप स्पोर्ट्स क्लबची खेळाडू ईश्वरी निलेश सोनवणे हिने 44 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक (Gold medal) पटकावले असून या यशामुळे ईश्वरी सोनवणे ला जागतिक स्तरावर खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती ईश्वरी चे प्रशिक्षक संतोष बसनेट यांनी दिली आहे. या यशामुळे गरुड झेप अकॅडमी चे संस्थापक प्रा डॉ एस एस सोनवणे यांच्यासह तिचे महाराष्ट्रभरातून कौतुक केले जात आहे.

ईश्वरी ला लहानपणापासूनच खेळाची आवड असून आपले शिक्षण पूर्ण करत ती खेळायला खूप प्राधान्य देते या स्पर्धेत तिला जे यश प्राप्त झाले त्यामागे तिचे खूप कठोर परिश्रम मेहनत आहे.भविष्यात ती भारतासाठी एक उत्तम खेळाडू बनेल व भारताचे नाव तायकांदो खेळामध्ये जागतिक पातळीवर घेऊन जाईल याची मला खात्री आहे.

- मीरा सोनवणे,आई

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com