निवडणुकीचा खर्च सादर करा: उपजिल्हाधिकारी

निवडणुकीचा खर्च सादर करा: उपजिल्हाधिकारी

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यातील (nashik district) 196 ग्रामपंचायतींची (gram panchayat) सार्वत्रिक निवडणूक (election) 18 डिसेंबर 2022 रोजी झाली असून या निवडणूकीचा निकाल (Election results) 21 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक (election) लढविणार्‍या उमेदवारांनी 19 जानेवारी 2023 पर्यंत निवडणुकीचा खर्च सादर करावा, असे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन गावंडे (Deputy Collector (Rehabilitation) Nitin Gawande) यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (Maharashtra Gram Panchayat Act), 1958 चे कलम 14 (ब) अन्वये बिनविरोध (Unopposed) व निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केलेल्या दिनांकापासून 30 दिवसांचे आत म्हणजेच 19 जानेवारी 2023 पावेतो निवडणुकीचा खर्च सादर करणे बंधनकारक आहे.

निर्धारित मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब न सादर करणार्‍या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. बिनविरोध व निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात विहित मुदतीत सादर करण्याची दक्षता घ्यावी, असेही उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन गावंडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com