Video : सांगा आमचं काय चुकलं?; शाळा बंद, चिमुकल्यांची १५ किमीची पायपीट

jalgaon-digital
1 Min Read

इगतपुरी | Igatpuri

येथील भाम धरणामुळे (Bham Dam) विस्थापित झालेल्या काळूस्ते (Kaluste) येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा (Darwadi ZP School) बंद झाली आहे. त्यामुळे या शाळेतील पहिली ते चौथीचे विद्यार्थी दरेवाडीपासून इगतपुरी पंचायत समितीत शाळा भरवण्यासाठी पायी निघाले आहेत…

दरेवाडीपासून शाळेचे अंतर किमान १० ते १५ किमी आहे. उपाशीपोटी शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी दप्तर घेऊन पायी चालत आंदोलन करत आहेत. इगतपुरी तालुक्याच्या शिक्षण प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थ संतापलेले आहेत.

अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; ‘पाहा’ थक्क करणारा व्हिडीओ…

भाम धरणामुळे विस्थापित झालेल्या काळूस्तेपैकी दरेवाडी येथ जिपची १ ली ते ४ थी पर्यंतची शाळा होती. धरणामुळे दरेवाडीचे नवीन जागेत पुर्नवसन करण्यात आले. मात्र काही कुटुंब त्या जागेत जाण्यासाठी तयार नाहीत.

Video : …तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

येथील शाळा कालपासून बंद करण्यात आली. आता येथील मुलांनी कोणत्या शाळेत जायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आज इगतपुरी पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.

गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *