''ना प्लास्टिकचा वापर करणार, ना गोदावरीत सांडपाणी सोडणार''; 'सफर गोदावरीची' उपक्रमात सारडा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थीनींचा निर्धार

''ना प्लास्टिकचा वापर करणार, ना गोदावरीत सांडपाणी सोडणार''; 'सफर गोदावरीची' उपक्रमात सारडा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थीनींचा निर्धार

नाशिक | Nashik

खळाळून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आता सर्वांनी प्रदूषण संंपवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करायचा नाही. गोदावरीत सांडपाणी सोडायचे नाही. असा निर्धार करत आज मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यालयांच्या विद्यार्थीनींनी प्रदूषण मुक्त गोदावरीचा संकल्प 'सफर गोदावरीची' या कार्यक्रमात केला.

दैनिक ’देशदूत’च्या माध्यमातून शालीमार येथील मा. रा. सारडा कन्या विद्यालयात ’सफर गोदावरीची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोदावरी प्रमी देवांग जानी, गोदावरी गटारीकरण विरेाधी मंचचे अध्यक्ष निशिकांत पगारे, पार्यावरणवादी जगबीर सिंग, दैनिक. ’देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, विद्यालयाच्या मुख्यध्यापीका राजश्री चंंद्रात्रे, मनीषा देशपांड, गंगाधर बदादे, सुर्यभान जगताप , रामदास चव्हाण, अतुल भालेराव, सारीका अहीरे, सुप्रीया देशपांडे आदी उपस्थीत होते.

यावेळी निशिकांत पगारे यांंनी गोदावरीच्या त्र्यंबकेश्वर ते राजमुंद्री दरम्यानच्या प्रवासाची माहिती विषद केली. गोदावरी खळाळती राहण्यासाठी तिच्या जिवंत स्त्रोंतांना वाहते करण्यासोबतच गोदावरीला प्रदूषण मुक्त करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्यासाठी गोदारावरीत सांडपाणी जाणार नाही सोबतच नदी पात्रामध्ये प्लॅस्टीकचा कचरा टाकणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

जगबीर सिंग यांनी प्लॅस्टीकचे धोके विषद केले. या पुढे स्वताःही प्लॅस्टीक पिशवी वापरणार नाही. दुसऱ्यांनाही वापरण्यापासुन परावृत्त करु. असा निर्धार त्यानी विद्यार्थीनींकडुन करवुन घेतला. गोदावरी नदी स्वच्छ निर्मल व अविरल राहण्यासाठी उपाय योजना करताना जनसामान्यामध्ये जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. नदी पात्रात निर्माल्य कचरा टाकणाऱ्यांना दंडात्मक कारवाई बरोबरच नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने याबाबत जागरुकता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले.

देवांग जानी यांनी गोदावरी नदीच्या तळातील काँक्रीट पूर्णपणे काढले जावे यासाठी व नदीतील १७ प्राचीन कुंड पुनर्रर्जिवीत व्हावीत यासाठी न्यायालयीन याचिका दाखल केली याची माहीती दिली. गोदावरीच्या इतिहासासह वर्तमानातील अवस्थेची जाणिव जानी यांनी करुन दिली.

’देशदूत’च्या संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांनी ’सफर गोदावरीची’ या उपक्रमाचे उद्दिष्ट विषद करुन त्याच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच या माध्यमातून जनसामान्यांमध्ये गोदावरीबद्दलचे प्रेम जागृत करुन नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यात विद्यार्थीनीनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यानींना कापडी पिशव्यांचे वाटप करुन या पुढे प्लॅस्टीक पिशवी वापरणार नाही असा निर्धार करण्यात आला.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com