ऑफलाईन परीक्षेस विरोध: आंदोलन करणाऱ्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर लाठीमार

ऑफलाईन परीक्षेस विरोध: आंदोलन करणाऱ्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांवर लाठीमार

राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाइन (SSC HSC Exam 2022) पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात सोमवारी अचानक, कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन परीक्षेच्या (10th 12th online exam) मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. नागपूर (Nagpur), अकोला (Akola) आणि पुण्यात (Pune) शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत आंदोलन (10th 12th Student Agitation) केले. दरम्यान, मुंबई शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी (Students) घेराव घातला आहे. ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली

दहावी बारावी परीक्षा ऑनलाइन घ्यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या मार्च महिन्यात ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाली होती. यंदा ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्ध्या तासाचा अतिरिक्त वेळही देण्यात येणार आहे. मात्र ३१ जानेवारी रोजी राज्यात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी निदर्शने केली.

विद्यार्थी का झाले आक्रमक

चार दिवसांपूर्वी एक हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. दोन वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेलं नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओमधून केला आहे.

'हिंदुस्थानी भाऊ'चा पोलिसांकडून शोध सुरू

हजारो विद्यार्थी नियोजन पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांच्या घराबाहेर जमा होऊन तोडफोड केल्याच्या या घटनेमागे 'हिंदुस्थानी भाऊ' असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील 'हिंदुस्थानी भाऊ'चा शोध घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com