Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याबारावीच्या विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या

बारावीच्या विद्यार्थ्याची अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या

मुंबई | Mumbai

आजपासून बारावीच्या परीक्षा (Exams) सुरू झाल्या असून एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वंश म्हात्रे (१७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून गेल्या काही दिवसांपासून अभ्यासामुळे तो तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल (दि.२०) रोजी रात्री आई-वडील घरात नसल्याने त्यावेळी वंश याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या

त्यानंतर वंशचे आई-वडील घरी आल्यावर त्यांना दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी लॅचने दरवाजा उघडल्यानंतर त्यांना वंशचा मृतदेह (Dead Body) पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

आमदारासाठी ५० कोटी, खासदारासाठी…; राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

दरम्यान, या घटनेची माहिती पनवेल पोलिसांना (Panvel Police) मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला असून अभ्यास (Study) आणि इतर तणावांमुळे आत्महत्येसारखे पाऊल न उचलण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ठाकरे गटाला पुन्हा धक्का; आता ‘हे’ कार्यालय देखील शिंदे गटाच्या ताब्यात

- Advertisment -

ताज्या बातम्या