Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याब्रिटीशकालीन पुलांचे संरचनात्मक लेखा परीक्षण झाले, पुढे काय?

ब्रिटीशकालीन पुलांचे संरचनात्मक लेखा परीक्षण झाले, पुढे काय?

पंचवटी । कल्पेश अहिरे Panchavati

गुजरातमधील ( Gujrat ) मोरबी ( Morbee )येथे पूल तुटून भयानक दुर्घटना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली, माहिती घेतली व मार्गदर्शक सूचनाही केल्या. त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात देखील अनेक जुने पूल आहेत. नाशिक मधील ब्रिटिश कालीन पुलांचे यापूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले.मात्र या ऑडिटनंतर पुढे काय कार्यवाही झाली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

- Advertisement -

नाशिकमधील सर्वात महत्त्वाचा 125 वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुलाचे मुंबई येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाच्या मार्फत महापालिकेने ऑडिट पूर्ण केले आहे. गोदा घाटावरील राम सेतू पुलाचे देखील व्हिजेटीआयने ऑडिट पूर्ण केले असून संत गाडगेबाबा महाराज पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अहिल्याबाई होळकर पूल 125 वर्षांपूर्वीचा आहे. पूल मजबूत असला तरी या पुलाबाबत ऑडिटनंतर काही शिफारशी देखील करण्यात आल्या आहेत. या शिफारशी संदर्भात स्मार्ट सिटीने आवश्यक कार्यवाही करणे आवश्यक आहे. अहिल्याबाई होळकर पुलाला मध्यंतरी स्टार्टअप अंतर्गत नाशिकमधील युवकांनी लावलेले सेंन्सर निधीअभावी काढून घेण्यात आले आहेत. या सेन्सरसाठी लागणारी सुमारे 25 लाख रुपयांची रक्कम न मिळाल्याने हे सेन्सर काढण्यात आल्याचे कळते.

आधुनिकरित्या पुलाची ताजी स्थिती मिळणारी यंत्रणा स्मार्ट सिटीकडे नसल्याचेही समजते. विपुल बंब आणि अरविंद जाधव यांच्या कोअर टेक्साई इनोव्हेशन या कंपनीने स्टार्ट अप अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर अहिल्याबाई होळकर पुलाला सेन्सर बसवले होते. या सेन्सर मुळे पुलावरील वाहतुकीच्या दरम्यान होणारी दुर्घटना तसेच या पुलावर दुर्घटना घडलीच तर त्या दुर्घटनेबाबत नागरिकांना अलर्ट करण्याची व्यवस्था या सेंसरमध्ये होती. त्याचे नियंत्रण स्मार्ट सिटीच्या कंट्रोल रूममध्ये होते.या प्रयोगाची मुदत संपल्यानंतर कंपनीने मागितलेल्या 25 लाख रुपयांबाबतचा निर्णय प्रलंबित असल्याने सेंसर काढण्यात आले असल्याचे स्मार्ट सिटीचे सुमंत मोरे यांनी सांगितले.

गोदा घाटावरील राम सेतू पुलाचे देखील व्हीजेटीआयकडून स्मार्ट सिटीने स्ट्रक्चरल ऑडिट केले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

1969 साली बांधण्यात आलेल्या गाडगे महाराज धर्मशाळे शेजारील गाडगे महाराज पुलाचे देखील ऑडिट करण्याची सूचना करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या