Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशIran Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण हादरला; ७ ठार, शेकडो जखमी

Iran Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण हादरला; ७ ठार, शेकडो जखमी

इराण | Iran

भूकंपाच्या तीव्र झटक्याने इराण हादरला आहे (Iran Earthquake). यामध्ये आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४४० लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर तीव्रता ५.९ इतकी मोजण्यात आली आहे.

- Advertisement -

इराणच्या पश्चिम भागातअजरबैजान भागातील खोय शहरात शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्की-इराण सीमेजवळ पश्चिम अजरबैजान प्रांत (West Azarbaijan Province) च्या खोय शहरात भूकंपाचे धक्के सर्वाधिक जाणवले. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू

इराण सरकारने सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. आपात्कालीन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे, त्या भागात बर्फवृष्टी होत आहे. तिथलं तापमान हे उणे शुन्याच्या खाली आहे.

अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. इराणपासून भूगर्भीय फाल्टलाइंस (geological faultlines) जाते. त्यामुळे मागील अनेक वर्षांमध्ये अशा भागात विनाशकारी भूकंप आले आहे.

माझे बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात; चिमुकल्याच्या ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

इराणच्या आपत्कालीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. भूकंपामुळे जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

IAF Planes Crash : एकाच दिवशी वायुसेनेच्या 2 विमानांचा अपघात

- Advertisment -

ताज्या बातम्या