'या' सूचनांचे ततोतंत पालन करावे: विभागीय आयुक्त गमे

'या' सूचनांचे ततोतंत पालन करावे: विभागीय आयुक्त गमे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ (Nashik Division Graduate Constituency) द्विवार्षिक निवडणूक (election) 2023 जाहिर झाली आहे. नाशिक, अहदमदनगर, धुळे, जळगाव व नंदूरबार जिल्ह्यात निवडणूक आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागु करण्यात आलेली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या सूचनांचे ततोंत पालन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Dr. Radhakrishna Game) यांनी दिल्या. महाराष्ट्र विधानपरिषद (Maharashtra Legislative Council) नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector Office) मध्यवर्ती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) बोलत होते. यावेळी पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर (Inspector General of Police BG Shekhar) पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी (Collector Gangatharan.D), उपायुक्त रमेश काळे, उपायुक्त प्रज्ञा बडे-मिसाळ, उपायुक्त उन्मेष महाजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे , उपजिल्हाधिकारी स्वाती थविल व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दूरदृश्यप्रणालीद्वारे अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार मनीषा खत्री उपस्थित होते. विभागीय आयुक्त श्री.गमे पुढे म्हणाले की, लोकसभा व विधानसभेप्रमाणे आचारसंहिता राहणार असून अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे कामकाज करावे. गरजेनुसार मतदान केंद्र (polling station) वाढविता येणार आहे. अंतिम मतदार यादीच्या (Electoral Roll) प्रती नाशिक विभागातील सर्व राजकीय पक्षांना वितरीत करुन नोंदी घेण्यात याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक-2023 साठी विभागीय आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी असून आणि विभागातील पाचही जिल्हाधिकारी तसेच उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहायक निवडणूक अधिकारी असणार आहेत. नाशिक विभागात एकूण 338 मतदार केंद्र असून 2 लाख 58 हजार 351 पदवीधर मतदार आहेत. 12 जानेवारी,2023 पर्यंत ऑनलाईन मतदार नोंदणी करता येणार असल्याने ज्यांची नोंदणी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहनही श्री गमे यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com