Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशआज रात्रीपासून दिल्लीत लॉकडाऊन

आज रात्रीपासून दिल्लीत लॉकडाऊन

नवी दिल्ली :

वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतही लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आज रात्री १० वाजेपासून २६ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय जाहीर केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री यांनी मजुरांना आवाहन करतांना सांगितले की, हा लहान लॉकडाऊन आहे. प्लीज तुम्ही दिल्लीतच थांबा. सरकार आपल्याकडे पुर्ण लक्ष देईल.

कंट्रोल रुमची निर्मिती

दिल्लीत रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक ठिकाणी बेडस उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होऊ शकलेलं नाही. यामुळे दिल्ली सरकारने एका कंट्रोल रुमचीही स्थापना केली आहे. हा कंट्रोल रुम ऑक्सिजन, रेमडेसिवीर पुरवठ्याच्या डाटावर नियंत्रण ठेवणार आहे.

कोरोना विषाणूच्या स्थितीबाबत बैठक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बिजल यांनी सोमवारी कोरोना विषाणूच्या स्थितीबाबत बैठक घेतली. ज्यात संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात आला. आज रात्रीपासून सक्तीने ही संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे, नागरिकांना २६ एप्रिलपर्यंत घरातच राहावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या