नियम न पाळणाऱ्यांंवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

नियम न पाळणाऱ्यांंवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होते आणि आहेत. शिवाय नागरिक नियम पाळतात सुद्धा पण काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुल आणि बेजबाबदार वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray यांनी शनिवारी दिली. राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध आपल्या भल्यासाठी आणि करोना विषाणूच्या corona virus जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहेत हे लक्षात घ्या, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोरोना रुग्णांची corona patients विक्रमी वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने शनिवारी काही कडक निर्बंध लागू केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

करोनाच्या विषाणूशी लढताना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पावलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपले रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. परिणामी वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सर्व ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकाने आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे, याची जाणीवही ठाकरे यांनी नागरिकांना करून दिली आहे.

आज आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे हे नाकारता येत नाही. रुग्ण संख्या याच वेगाने वाढली तर सहव्याधी असलेल्या किंवा अद्याप लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल करावे लागून ऑक्सिजनची मागणी देखील वाढू शकते. आज अनेक ठिकाणी आपले डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गाने आजारी पडले आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे.

आपल्याकडे साधन सामुग्री पुरेशी आहे. दोन वर्षात आपण सुविधांमध्ये वाढ केली आहे पण डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे असे नाही तर देशात इतरत्र आणि काही देशांत देखील यामुळे समस्या निर्माण झाली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे माझे अतिशय कळकळीचे आवाहन आहे की नियम पाळा, सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

आपण शाळा, महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असे समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका, असेही आवाहनही ठाकरे यांनी तरुणाईला केले.

या सगळ्यामध्ये लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे आहे हे लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांत लसीकरण पुरेसे झालेले नाही. तिथेट रुग्ण संख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com