रावेर तालुक्यात वादळाचे थैमान

४ कोटी ५० लाख रुपये नुकसानीचा अंदाज 
विवरे बुद्रूक येथील केळी उत्पादक शेतकरी दिलीप लढे यांच्या शेतातील केळी बागेचे झालेले नुकसान
विवरे बुद्रूक येथील केळी उत्पादक शेतकरी दिलीप लढे यांच्या शेतातील केळी बागेचे झालेले नुकसान

रावेर Raver|प्रतिनिधी-

तालुक्यात शनिवारी रात्री वादळाने (Stormy) थैमान घालून गहू,हरभरा,मका,आणि केळी पिकांचे नुकसान (Damage to crops)केल्याने प्रशासनाने (administration) तब्बल ४ कोटी ५० लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.

  याबाबत तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिलेल्या माहितीवरून ३६ गावांमध्ये १४२ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे १२३ हेक्टर,३५० गव्हू उत्पादकांचे २६२ हेक्टर ५२० मका उत्पादकांचे ४४४.२५ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.तर केळी नुकसानीबाबत प्रशासनाने अद्याप माहिती दिलेली नाही.

झालेल्या नुकसानीत खिर्डी बुद्रुक खुर्द,वाघाडी,शिंगाडी,रेन्भोटा,खानापूर.चोरवड,भोर,होळ,ऐनपूर,निम्बोल,रावेर,वाघोड,कर्जोद,बोरखेडा,मोरगांव खुर्द,भोकरी,तामसवाडी,लालमाती,अभोडा बु,जिन्सी,केह्राळे,मंगरूळ,खिरवड,पातोंडी,पुनखेडे,थेरोळे,धुरखेडे,निंभोरासीम,बोह्र्डे,अजनाड,नेहता,अटवाडे,दोधे,नांदूरखेडा,अजंदे या गावातील पिकांचे वादळाने मोठे नुकसान झाले आहे.

नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे तलाठी व महसूल कर्मचारी पेन्शन साठी संपात सहभागी असून देखील हि नैसर्गिक आपत्ती पाहून शेतकर्यांच्या मदतीला धावून आले आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास सुरवात झाल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com